March 11, 2025 1:47 PM

printer

येत्या 3 वर्षांत देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात डे केअर कॅन्सर सेंटर उघडण्यात येणार

 
 
 
केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांच्या विरोधात केलेल्या टिप्पणीवरून आज लोकसभेत तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी आणि सत्ताधारी पक्षांच्या सदस्यांमध्ये जोरदार वाद झाला. प्रश्नोत्तराच्या तासांदरम्यान, बॅनर्जी यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्याशी संबंधित पश्चिम बंगालच्या कथित विलंबित निधीचा मुद्दा उपस्थित करताना सिंह यांच्याविरोधात टिप्पणी केली.
 
 
सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी या टिप्पणीवर आक्षेप घेतला. संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनीही बॅनर्जी यांच्या वक्तव्याचा निषेध केला. दरम्यान, सभापती ओम बिर्ला यांनी सर्व सदस्यांना एकमेकावर टिप्पणी न करण्याचं आणि सभागृहात सुव्यवस्था राखण्याचं आवाहन केलं. 
प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेत अद्याप सहभागी नसलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये अर्थसहाय्य द्यायला सरकार तयार असल्याचं प्रतिपादन कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज लोकसभेत केलं.
 
 
अशा शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी करून घेण्यासाठी राज्य सरकारांनी केंद्राला मदत करावी, असं आवाहनही त्यांनी प्रश्नोत्तराच्या तासात केलं. केंद्र सरकार कोणत्याही राज्यांच्या बाबतीत भेदभाव करत नाही, अशी ग्वाही चौहान यांनी तमिळनाडूबद्दलच्या प्रश्नाच्या उत्तरादाखल दिली.येत्या तीन वर्षांत देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात डे केअर कॅन्सर सेंटर उघडण्यात येतील, अशी माहिती आज राज्यसभेत केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी एका पुरवणी प्रश्नाच्या उत्तरात दिली. पुढच्या आर्थिक वर्षात दोनशे डे केअर कॅन्सर सेंटर उघडली जातील, असंही नड्डा म्हणाले.
 
 
त्यानंतर विरोधी पक्ष सदस्यांनी दोन मतदारांना एकच ओळखपत्र क्रमांक जारी झाल्यासंदर्भातले स्थगन प्रस्ताव उपाध्यक्ष हरिवंश यांच्यासमोर सादर केले. हरिवंश यांनी ते फेटाळून लावले आणि दक्षिणेकडच्या राज्यांमधल्या सीमांकनाचा प्रस्ताव मांडला. त्यावरून द्रमुक, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, आम आदमी पक्ष आणि इतर पक्ष सदस्यांनी या मुद्द्यांवरून घोषणबाजी सुरू केली. उपाध्यक्षांनी त्यांना आपापल्या जागी परत जाऊन कामकाज सुरू ठेवण्याचं आवाहन केलं. मात्र, तरीही गदारोळ सुरूच राहिल्याने राज्यसभेचं कामकाज आज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. 
सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.