December 11, 2025 3:43 PM | dattatray bharne

printer

राज्यात एकही शेतकरी लाभार्थी योजनांच्या लाभापासून वंचित राहणार नाही – कृषीमंत्री

शेतकऱ्यांना शेततळी, अवजार खरेदी आणि इतर गरजांच्या मदतीसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही आणि एकही शेतकरी लाभार्थी वंचित राहणार नाही, अशी ग्वाही कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज विधानपरिषदेत दिली.

 

गेल्या ४ वर्षांपासून विविध प्रकारच्या मदतीसाठी शेतकऱ्यांनी केलेले सुमारे ४८ लाख अर्ज कारवाईविना पडून असल्याबाबत रणजीतसिंग मोहिते पाटील, संजय खोडके, शशिकांत शिंदे आणि इतरांनी विचारलेल्या प्रश्नावर ते उत्तर देत होते. कृषी समृद्धी योजनेसाठी दरवर्षी ५ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याची माहिती त्यांनी दिली. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.