लेफ्टनंट जनरल अविनाश दास यांनी आज नवी दिल्लीतल्या ‘आर्मी हॉस्पिटल रिसर्च अँड रेफरल’चे कमांडंट म्हणून पदभार स्वीकारला. लेफ्टनंट जनरल दास हे कान, नाक आणि घसा तज्ञ असून त्यांनी सशस्त्र दलाच्या वैद्यकीय सेवांमध्ये जवळजवळ चार दशकं सेवा दिली आहे. दिल्ली कॅन्ट मध्ये बेस हॉस्पिटल आणि लखनऊ इथं कमांड हॉस्पिटलमध्ये वरिष्ठ सल्लागार पदासह दास यांनी अनेक महत्वाची पदं भूषवली आहेत.
Site Admin | November 2, 2025 7:04 PM
लेफ्टनंट जनरल अविनाश दास यांनी पदभार स्वीकारला