डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

November 9, 2024 10:55 AM

printer

करवीर निवासिनी श्री अंबाबाई महालक्ष्मीच्या दक्षिणायन किरणोत्सवास प्रारंभ

करवीर निवासिनी श्री अंबाबाई महालक्ष्मीच्या दक्षिणायन किरणोत्सवास कालपासून प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी मावळत्या सूर्याची किरणं देवीचे चरणस्पर्श करुन थोडी वर सरकत लुप्त झाली. हा अनोखा सोहळा सूर्यास्तापूर्वी काही क्षण अनुभवता येतो. सूर्याची सोनेरी किरणे पहिल्या दिवशी आईच्या चरणावर, दुसऱ्या दिवशी छातीवर आणि तिसऱ्या दिवशी मुखकमलाला स्पर्श करतात. गेली कित्येक शतके अव्याहत सुरू असलेला सुंदर, अलौकिक उत्सव 8 ते 12 नोव्हेंबर या काळात साजरा केला जातो. हा किरणोत्सव पाहण्यासाठी भाविक आणि पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती.