मल्याळी जेष्ठ अभिनेते मोहनलाल यांना 2023 या वर्षाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार निवड समितीच्या शिफारशीवरुन केंद्र सरकारने हा पुरस्कार जाहीर केला आहे.
प्रख्यात अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते असणाऱ्या मोहनलाल यांची कारकिर्द अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायक आहे. २३ सप्टेंबरला ७१व्या राष्ट्रीय फिल्म पुरस्कार समारंभात त्यांना फाळके पुरस्काराने गौरवण्यात येईल.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मोहनलाल यांचे अभिनंदन केलं आहे. मोहनलाल यांची अभिनयशैली उत्कृष्टता आणि बहुमुखी प्रतिभेचं प्रतीक आहे. आपल्या समृद्ध अभिनयाच्या जोरावर त्यांनी मल्याळम सिनेमा, रंगभूमीची अनेक दशके गाजवली, असं प्रधानमंत्री म्हणाले.