डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

बंगालच्या उपसागरात बुधवारपर्यंत चक्रीवादळ तयार होण्याचा इशारा

भारतीय हवामानशास्त्र विभागानं पुढील २४ तासांत पूर्व मध्य बंगालच्या उपसागरावर आणि उत्तर अंदमान समुद्रालगतच्या भागात कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवला आहे. तमिळनाडू, पुदुचेरी, कराईकल, केरळ आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटकात पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तसंच उद्या कर्नाटक आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.आयएमडीचे महासंचालक डॉक्टर मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितलं की, पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ बुधवारपर्यंत तयार होईल आणि गुरुवारी ओडिशा आणि पश्चिम बंगाल किनारपट्टीवर ताशी १०० ते १२० किलोमीटर वेगाने वाऱ्यासह धडकेल.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.