बंगालच्या उपसागरात आग्नेयेकडे निर्माण झालेल्या ‘मोंथा’ चक्रीवादळाचा जोर वाढत असून, ते आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीकडे सरकत आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनानं मदत कार्याची तयारी सुरु केली आहे. किनारपट्टीवरच्या जिल्ह्यांमध्ये एनडीआरएफची ८ आणि एसडीआरएफची ९ पथकं तैनात करण्यात आली आहेत. मच्छिमारांनी खोल समुद्रात जाऊ नये असा इशाराही देण्यात आला असून, येत्या बुधवारपर्यंत मासेमारी, नौकाविहार आणि किनारपट्टी भागातले सर्व प्रकारचे उपक्रम स्थगित करण्यात आले आहेत.
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पुडुचेरीमध्येही यानम इथल्या प्रशासनानंही खबरदारीच्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. हे चक्रीवादळ २८ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी किंवा रात्रीपर्यंत काकीनाडाजवळ धडकण्याची शक्यता आहे. येत्या २९ तारखेपर्यंत या भागात ताशी ९० ते १०० किलोमीटर वेगाने वारे वाहतील, तसंच अतिमुसळधार पाऊस पडेल असा अंदाज आहे.