October 30, 2025 8:04 PM | Cyclone Montha

printer

मोंथा चक्रीवादळामुळे पिकांचं प्रचंड नुकसान

मोंथा चक्रीवादळामुळे तेलंगणाच्या अर्ध्या भागात प्रचंड नुकसान केलं आहे. कापणीला आलेला भात आणि कापूस खरेदीच्या हंगामात पिकांचं नुकसान झालं आहे. नलगोंडा ते करीमनगरपर्यंत मुसळधार पावसाने हजारो एकरवरची भातपिकं जमीनदोस्त झाली आहेत. वारंगल, खम्मम आणि नलगोंडा या जिल्ह्यांना पावसाचा सर्वाधिक तडाखा बसला आहे. नलगोंडा, वारंगल, हनमकोंडा, महबुबाबाद, निजामाबाद या जिल्ह्यांमध्येही भातपिकासह अन्य पिकांचं नुकसान झालं आहे. मुसळधार पावसामुळे राज्यातलं जनजीवन विस्कळीत झालं असून ग्रामीण भागात रस्ते आणि रेल्वे सेवेला त्याचा फटका पडला आहे. तेलंगण राज्य सरकारने नुकसान भरपाईसाठी पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.