मोंथा चक्रीवादळाचा जोर आता कमी झाला असला तरी त्याच्या प्रभावामुळे देशाच्या विविध भागात पाऊस पडत आहे. आंध्रप्रदेश, ओदिशा आणि पश्चिम बंगालच्या काही भागाला याचा फटका बसला आहे.
महाराष्ट्राच्या सोलापूर, पुणे, चंद्रपूर, नागपूर, वाशीम आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होत आहे.
झारखंड, छत्तीसगड आणि मध्यप्रदेशात तापमानात घट झाली असून अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होत आहे. आणखी चार दिवस या वादळाचा प्रभाव कायम राहील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
कोकण, गोवा, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, पूर्व राजस्थान, ओदिशा, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, पश्चिम बंगालचा गंगेच्या खोऱ्यातील प्रदेश आणि मध्यप्रदेशात आज मेघगर्जनेसह वादळी वारे वाहतील असा हवामान विभागाचा अंदाज आहे.