श्रीलंकेत आलेल्या विनाशकारी दितवाह चक्रीवादळामुळे मरण पावलेल्यांची संख्या ४८६ वर पोहोचली असून अद्याप ३४१ जण बेपत्ता आहेत. आतापर्यंत १ लाख ७१ हजार जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं असून देशभरात सुमारे बाराशे बचाव केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. दरम्यान ऑपरेशन सागर बंधू अंतर्गत भारत श्रीलंकेला विविध पातळ्यांवर मदत पोहोचवत आहे. भारतीय हवाई दलाच्या हेलीकॉप्टरच्या सहाय्यानं अडकलेल्या लोकांची सुटका करणं, औषधांचा पुरवठा आणि दळणवळण यंत्रणा पुनर्स्थापित करण्यासाठी भारत सातत्यानं मदत करत आहे.
Site Admin | December 5, 2025 1:40 PM | Cyclone Ditwah | SRILANKA
श्रीलंकेत दितवाह चक्रीवादळामुळे ४८६ जणांचा मृत्यू