दितवाह चक्रीवादळाचा जोर ओसरून त्याचं कमी दाबाच्या पट्ट्यात रुपांतर झालं असून ते बंगालचा उपसागर आणि उत्तर तामिळनाडू तसंच पुद्दुचेरीच्या किनारी भागाकडे झुकलं आहे. गेल्या ६ तासात हे चक्रीवादळ दहा किलोमीटर प्रती तासाच्या गतीने उत्तरेकडे सरकलं असून ते चेन्नईपासून दक्षिणेकडे ९० किलोमीटर, पुद्दुचेरीपासून दक्षिणेकडे ९० किलोमीटर आणि कुड्डलोर आणि कराईकलपासून शंभर किलोमीटर अंतरावर आहे. कमी दाबाचा पट्टा उत्तर तामिळनाडू आणि पुद्दुचेरीपासून समांतर अंतरावर तीस किलोमीटरवर असेल. यामुळे तिरूवलुर जिल्ह्यात आज जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
Site Admin | December 1, 2025 1:34 PM | Cyclone Ditwah
दितवाह चक्रीवादळाचा जोर ओसरून कमी दाबाच्या पट्ट्यात रुपांतर