२०२२ ते २०२४ या तीन वर्षांत देशात डिजिटल अटकेसारख्या गुन्ह्यांमध्ये जवळपास तिपटीने वाढ झाली आहे, अशी माहिती आज राज्यसभेत गृहराज्यमंत्री बंडी संजयकुमार यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली. २०२२मध्ये सुमारे ४० हजार गुन्हे नोंदवले गेले होते. त्यात ९१ कोटी रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक झाली होती.
२०२४मध्ये सुमारे सव्वा लाख गुन्ह्यांची नोंद झाली. या कालावधी फसवणुकीची रक्कम २१ पटींनी वाढून सुमारे १ हजार ९३५ कोटी ५१ लाख रुपये इतकी झाल्याची माहिती त्यांनी दिली. चालू वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यापर्यंत १७ हजार ७१८ प्रकरणं नोंदवण्यात आली असून त्यातून २१० कोटी २१ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचंही ते म्हणाले.