कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट-CUET २०२५ चा निकाल राष्ट्रीय चाचणी एजन्सीनं आज जाहीर केला. या परीक्षेत एका विद्यार्थ्यानं चार विषयांमध्ये १०० पर्सेंटाईल गुण मिळवले आहेत.
देशातली विविध केंद्रीय विद्यापीठं आणि सहभागी संस्थांमधील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेशांसाठी ही परीक्षा घेतली जाते. १३ मे आणि ४ जून अशा दोन टप्प्यांमध्ये झालेल्या परीक्षेसाठी १३ लाख ५४ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल cuet.nta.nic.in या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येतील.