January 1, 2026 2:49 PM

printer

CSMIA विमानतळावर ३ कोटी ८९ लाख रुपये किमतीच्या सोन्याची तस्करी उघडकीस

DRI, अर्थात महसूल गुप्तचर संचालनालयानं काल मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या कारवाईत ३ कोटी ८९ लाख रुपये किमतीच्या सोन्याची तस्करी उघडकीला आणली. यावेळी DRI च्या पथकानं बहरीन इथून आलेल्या एका प्रवाशाकडून मेणाच्या स्वरूपात सोन्याची भुकटी भरलेल्या १२ कॅप्सूल जप्त केल्या. या प्रकरणी पुढला तपास सुरु असल्याचं DRI च्या सूत्रांनी सांगितलं.