सी आर एस अर्थात नागरी नोंदणी प्रणाली सॉफ्टवेअर नोंदणीत अनियमितता आढळल्याप्रकरणी राज्य सरकारने एका विशेष तपास पथकाची नियुक्ती केली आहे. तेराशे लोकसंख्या असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातल्या शेंदूरसनी या गावात जन्म आणि मृत्यूच्या २७ हजार नोंदी आढळल्याचं प्रकरण उघडकीस आलं होतं, या प्रकरणी हा तपास केला जाईल. हे पथक या आठवड्यात शेंदूरसनी इथं भेट देईल, आणि नोंदणी प्रणालीत काय चूक झाली याचा शोध घेईल.
या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा तपास यवतमाळ पोलीस करत आहेत.