डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

April 13, 2025 2:34 PM | CRPF

printer

CRPFच्या ५ कंपन्यांना पश्चिम बंगालच्या हिंसाचारग्रस्त मुर्शिदाबादमध्ये जाण्याचे आदेश

केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या पाच कंपन्यांना पश्चिम बंगालच्या हिंसाचारग्रस्त मुर्शिदाबादमध्ये जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रांची, जमशेदपूर आणि राजारहाट इथून या कंपन्या मुर्शिदाबादला जातील. वक्फ सुधारणा कायद्याच्या विरोधात इथं सुरू असलेल्या निदर्शनादरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर तातडीनं केंद्रीय सशस्त्र दलांना पाचारण करायचे आदेश कोलकाता उच्च न्यायालयानं काल दिले होते. दरम्यान, अतिरिक्त पोलीस महासंचालक सुप्रतिम सरकार आणि विनीत गोयल यांनी समशेरगंज इथं भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. सीमा सुरक्षा दलाचे दक्षिण बंगाल विभागाचे पोलीस महानिरीक्षक करणी सिंह शेखाबत यांनी राज्याचे पोलीस महासंचालक, अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि इतर पोलीस अधिकाऱ्यांसोबत या संदर्भात बैठक घेतली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.