November 21, 2025 2:47 PM | crop insurance

printer

पीक विम्यामध्ये आणखी दोन प्रकारच्या नुकसानीचा समावेश

पीक विम्यामध्ये आणखी दोन प्रकारच्या नुकसानीचा समावेश करण्यात आला आहे, असं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सांगितलं. नागपूरमध्ये सोळाव्या ऍग्रोव्हिजन कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभा पूर्वी  ते आज बातमीदारांशी बोलत होते. अतिवृष्टीमुळे शेतात साचलेल्या पाण्यामुळे झालेलं  नुकसान किंवा जंगली जनावरांमुळे शेतातल्या  पिकांचं  झालेलं नुकसान या दोन्ही बाबींमध्ये शेतकऱ्यांना पीकविम्यातून नुकसानभरपाई मिळू शकेल. शेतकऱ्यांच्या मागण्या आणि देशातल्या  परिस्थितीचा विचार करून केंद्र सरकारनं हे दोन बदल केल्याची माहिती त्यांनी दिली.