यंदाच्या खरीप आणि रबी हंगामासाठी पीक विमा योजनेसाठी आतापर्यंत केवळ ५५ हजार शेतकर्यांनी खरिपातल्या पिकांसाठी पीक विमा उतरविला आहे. ३१ जुलै ही पीक विम्याची अंतिम तारीख आहे. एका रुपयात पीक विमा योजनेत अनेक गैरप्रकार उघडकीला आल्यानं ती बंद करण्यात आली आहे. यंदा पीक कापणी प्रयोगातून निघालेल्या उत्पादनावर आधारित पीक विम्याची नुकसान भरपाई मिळणार आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी पीक विमा काढून घ्यावा, असं आवाहन पुणे कृषी विभागाकडून करण्यात आलं आहे.
Site Admin | July 30, 2025 7:24 PM | crop insurance | Maharashtra
पीक विम्यासाठी अर्ज करायची उद्या अंतिम मुदत
