डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

राज्याच्या सादर झालेल्या अतिरीक्त अर्थसंकल्पावर विरोधकांची टीका

फसव्या योजनांची ठिगळं लावलेला खोकेसंकल्प अशी टीका विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. सरकारनं निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्पाच्या नावाखाली महायुतीचा निवडणूक जाहीरनामाच सादर केला आहे, असा आरोप त्यांनी केला.  

 

हा अर्थसंकल्प आश्वासनांची अतिवृष्टी आणि थापांचा महापूर असून  त्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी न देता त्यांची लूट करण्यात आली  आहे, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. 

 

दिशाभूल करणारा अर्थसंकल्प अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली आहे. मोघम अर्थसंकल्प असून त्यात विभागनिहाय तरतुदी नसल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. 

 

अतिशय बेजबाबदार अर्थसंकल्प असून पेट्रोल डिझेलचे दर कमी करण्याचा नुसता आव आणि फक्त घोषणा असलेला पोकळ अर्थसंकल्प असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरच्चंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.