संसदेत विरोधी पक्षाच्या मागण्या स्वीकारल्या जात नसल्यामुळे संसदीय लोकशाहीचं पालन होत नसल्याची ज्येष्ठ नेते शरद पवार यांची टीका

संसदेत विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या मागण्या स्वीकारल्या जात नाहीत, याचा अर्थ देशात संसदीय लोकशाहीचं पालन नीट होत नाहीय, अशी टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज पुण्यात वार्ताहरांशी बोलताना केली. हे योग्य नसून यासाठी लोकांमध्ये जाऊन जागृती घडवून आणण्याची गरज आहे, असं ते म्हणाले. निवडणुकीच्या निकालानंतर लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता पसरली असून देशात हे प्रथमक घडत असल्याचं पवार म्हणाले. मतदान यंत्राबद्दल काही शंका आहेत, मात्र याबद्दल ठोस पुरावा नाही. काही जणांनी पुनर्मोजणीची मागणी केली आहे, मात्र आपल्याला यातून काही निष्पन्न होईल याची आशा नाही असं पवार यांनी सांगितलं.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.