पोर्तुगालचा सुप्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याने २०२६मध्ये होणाऱ्या फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेनंतर निवृत्त होणार असल्याचं जाहीर केलं आहे. आपली कारकिर्द आता अखेरच्या टप्प्यावर असून वयाची चाळीशी ही निवृत्त होण्याची योग्य वेळ असल्याचं त्याने सौदी अरेबिया इथे एका परिषदेत सांगितलं. येत्या फिफा विश्वचषकाच्या पात्रता फेरीचे सामने सुरू असून उद्या आयर्लंडविरुद्ध पोर्तुगाल हा सामना होणार आहे. हा सामना जिंकल्यास पोर्तुगालचा फिफा स्पर्धेत खेळण्याचा मार्ग मोकळा होईल.
जगभरात असंख्य चाहते असलेल्या रोनाल्डो याने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामन्यांमध्ये ९५०पेक्षा जास्त गोल केले आहेत. सध्या तो सौदी अरेबियाच्या अल नस्र या फुटबॉल क्लबसाठी खेळतो.