डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

क्रिकेटपटू रविचंद्रन आश्विन आयपीएल मधून निवृत्त

क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विनने आज आयपीएल अर्थात इंडियन प्रीमियर लीगमधून निवृत्तीची घोषणा केली. प्रत्येक सुरुवातीला एक अंत असतो, आपल्या आयपीएल कारकीर्दीचा आज शेवट झाला असं अश्विन समाजमाध्यमावरल्या संदेशात म्हणाला. अश्विनने बीसीसीआय आणि आयपीएलच्या सर्व फ्रँचाईजचे आभार मानले.

 

अश्विनने २००९ ला चेन्नई सुपर किंग्जकडून आपल्या आयपीएल कारकीर्दीला सुरुवात केली होती. त्यानंतर त्याने रायजिंग पुणे सुपरजायंट्स, पंजाब किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स या संघांचं प्रतिनिधित्व केलं. यावर्षी तो पुन्हा चेन्नई सुपर किंग्ज संघात परतला होता. आयपीएलमधे दीडशे बळी घेणारा अश्विन हा हरभनज सिंगनंतरचा दुसरा फिरकी गोलंदाज ठरला.