भारताची सलामीवीर शेफाली वर्मा हिला नोव्हेंबर २०२५ या महिन्याची आयसीसी सर्वोत्तम महिला खेळाडू म्हणून गौरवण्यात आलं. महिला विश्वचषक स्पर्धेतल्या अंतिम सामन्यात तिने केलेल्या निर्णायक कामगिरीसाठी तिचा ‘प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कारनं गौरव करण्यात आला. दुखापतीमुळे संघाबाहेर गेलेल्या प्रतिका रावलच्या जागी संघात प्रवेश मिळालेल्या शेफालीनं या संधीचं सोनं करत ७८ चेंडूत ८७ धावा केल्या होत्या. महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय सलामीवीरानं केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे. शेफालीनं या सामन्यात प्रभावी गोलंदाजी करत ३६ धावांच्या मोबदल्यात २ खेळाडू बाद केले होते.
Site Admin | December 15, 2025 6:27 PM | Cricket World Cup | Shafali Verma
भारताची सलामीवीर शेफाली वर्माचा गौरव