कसोटी क्रिकेट मालिकेत आज न्यूझिलंड आणि भारत यांच्यात दुसऱ्या डावाचा सामना

बंगळुरु इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात न्यूझिलंड आज दुसऱ्या डावाची सुरुवात करणार आहे. एमए चिदंबरम मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात न्यूझिलंडला जिंकण्यासाठी केवळ 107 धावांची गरज आहे. कसोटीच्या कालच्या चौथ्या दिवशी भारतानं दुसऱ्या डावात 462 धावा केल्या. सरफराज खानची शतकी खेळी आणि ऋषभ पंतच्या केवळ एका धावेनं हुकलेल्या शतकाच्या जोरावर भारताला ही धावसंख्या उभारता आली. त्याआधी न्यूझीलंडनं 402 धावा केल्या होत्या. भारतानं न्यूझीलंडसमोर विजयासाठी 107 धावांचं आव्हान ठेवलं आहे. जागतिक कसोटी क्रमवारीत भारत सध्या अग्रस्थानी आहे, तर न्यूझिलंड सहाव्या स्थानावर आहे.