भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या तेंडुलकर-अँडरसन चषक पाच कसोटी क्रिकेट मालिकेतला पहिला सामना आज इंग्लंडमधे लीड्स इथं हेडिंग्ले मैदानावर सुरु झाला. इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे.
भारताचा धावसंख्या ९१ झाली असताना के एल राहुल ४२ धावांवर बाद झाला, तर त्यानंतर आलेला साई सुदर्शन शून्यावर बाद झाला. मात्र त्यानंतर यशस्वी जैस्वाल आणि कर्णधार शुभमन गिल यांनी दमदार फलंदाजी करत धावसंख्या वाढवली. जैस्वालनं शतक, तर गिलनं अर्धशतक पूर्ण केलं आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा, भारताच्या २ बाद २१५ धावा झाल्या होत्या.
१२ जूनला अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघाताबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी दोन्ही संघातले खेळाडू दंडाला काळी पट्टी बांधून मैदानात उतरले.