मेलबर्न इथं झालेल्या दुसऱ्या टी-२० क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारतावर ४ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं. मात्र भारताच्या फलंदाजांनी अक्षरशः हाराकिरी केली. अभिषेक शर्माच्या ६८ धावा केल्या. त्याखालोखाल हर्षित राणानं ३५ धावांचं योगदान दिलं. त्यांच्याव्यतिरिक्त भारताच्या इतर खेळाडूंना दोन अंकी धावा करता आल्या नाहीत. चार फलंदाज शून्यावर बाद झाले. त्यामुळे सामन्यातले ८ चेंडू बाकी असताना भारताचा डाव १२५ धावांवर आटोपला.
ऑस्ट्रेलियानं ही धावसंख्या ६ गडी गमावून सामन्यातले ४० चेंडू बाकी असताना पार केली. अवघ्या १३ धावा देत भारताचे तीन गडी बाद करणारा ऑस्ट्रेलियाचा जॉश हेझलवूड सामनावीर ठरला.