चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत आज ब गटात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात लाहोर इथं सुरु असलेल्या या सामन्यात इंग्लंडनं ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी ३५२ धावांचं आव्हान ठेवलं आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियान नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करताना केवळ ४३ धावांतच फिल सॉल्ट आणि जॅमी स्मिथ यांना माघारी धाडलं. मात्र त्यानंतर मात्र शतकवीर डकेट आणि अर्धशतकवीर रुट यांनी तिसऱ्या गड्यासाठी १५८ धावांची भागिदारी केल्यानं, इंग्लंडनं निर्धारीत ५० षटकांत ८ बाद ३५१ धावा केल्या. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासातली ही आजवरची सर्वोच्च धावसंख्या आहे. इंग्लंडच्या वतीनं डकेट यानं सर्वाधिक १६५, तर रुट यानं ६८ धावा केल्या.
Site Admin | February 22, 2025 8:03 PM | Champions Trophy Cricket
Champions Trophy Cricket: इंग्लंडचं ऑस्ट्रेलियासमोर ३५२ धावांचं आव्हान
