डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

क्रिकेट – हर्षित राणा याचा राखीव खेळाडूंमधे समावेश

इंग्लंडविरोधात होणाऱ्या कसोटी क्रिकेट मालिकेसाठी भारतीय संघात जलदगती गोलंदाज हर्षित राणा याचा राखीव खेळाडूंमधे समावेश झाला आहे. बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं काल रात्री ही घोषणा केली. हर्षित राणाने ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध कसोटी क्रिकेटमधे पदार्पण केलं होतं. त्याने आतापर्यंत दोन कसोटी, पाच एकदिवसीय आणि एक टी ट्वेंटी सामना खेळला आहे.
इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाचं नेतृत्व शुभमन गिल करणार असून संघात ऋषभ पंत, यशस्वी जायसवाल, के एल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यु ईश्वरन, करुण नायर, नितीश रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल, वाशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव यांचा समावेश आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा