क्रिकेटमध्ये, भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संघांदरम्यान ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज कॅनबेरा इथं रंगणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी पावणेदोन वाजता सामन्याला सुरुवात होईल. ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत २-१ अशा पराभवाचा सामना केल्यानंतर सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताचा संघ टी-२० मालिका जिंकायचं लक्ष्य ठेवून मैदानात उतरणार आहे.
Site Admin | October 29, 2025 1:32 PM | AUSvIND | Cricket
भारत – ऑस्ट्रेलियाच्या दरम्यान टी-२० सामन्यांच्या क्रिकेट मालिकेतला आज पहिला सामना