दक्षिण अफ्रिकेविरुद्धची टी-ट्वेंटी क्रिकेट मालिका भारतानं ३-१ अशी जिंकली. अहमदाबाद इथं काल झालेल्या पाचव्या सामन्यात भारतानं दक्षिण अफ्रिकेवर ३० धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना भारताच्या संघानं २० षटकांत २३१ धावा केल्या. तिलक वर्मानं ७३ तर हार्दिक पांड्यानं ६३ धावा केल्या. हार्दिक पांड्यानं केवळ १६ चेंडूत अर्धशतक ठोकलं. विजयासाठी आवश्यक २३२ धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ २० षटकांत २०१ धावा करू शकला. वरुण चक्रवर्तीनं पाहुण्या संघाचे चार फलंदाज बाद केले. हार्दिक पांड्या सामनावीर तर वरुण चक्रवर्ती मालिकावीर ठरला.