December 12, 2025 10:46 AM | Cricket | t-20

printer

वीस षटकांच्या दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा भारतावर विजय

चंदीगड इथं काल झालेल्या वीस षटकांच्या दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं भारतावर 51 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना पाहुण्यांच्या 4 बाद 213 धावा झाल्या. उत्तरादाखल भारतीय संघ सर्वबाद 162 धावाच करु शकला. पाच सामन्यांच्या या मालिकेत आता दोन्ही संघांची 1-1 अशी बरोबरी झाली आहे. तिसरा सामना येत्या 14 डिसेंबरला धरमशाला इथं होणार आहे.

 

दरम्यान आशियाई क्रिकेट परिषदेच्या 19 वर्षांखालील आशिया कप 2025 ला आज दुबईमध्ये सुरू होत आहे. आयुष म्हात्रे याच्या नेतृत्वाखालील भारत आणि यजमान संयुक्त अरब अमिराती यांच्यात आज सामना होणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना सकाळी साडेदाह वाजता सुरू होईल. तर येत्या रविवारी भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे.a