दक्षिण अफ्रिकेविरुद्ध टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतील कटक मध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात, भारतानं काल दक्षिण आफ्रिकेला 101 धावांनी पराभूत केलं.
भारतानं दिलेल्या 176 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ केवळ 74 धावांमध्ये गारद झाला. हार्दिक पांड्या 28 चेंडूत 59 धावा करून सामनावीर ठरला. अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा सामना येत्या गुरुवारी चंदीगड इथं खेळला जाणार आहे.