December 9, 2025 9:25 AM | Cricket | t-20

printer

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील 20 षटकांच्या क्रिकेट मालिकेला आजपासून सुरुवात

भारत आणि दक्षिणआफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-ट्वेंटी क्रिकेट मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे.सलामीचा सामना आज संध्याकाळी सात वाजता ओडिशातल्या कटक इथल्या बाराबती मैदानावर खेळण्यात येणार आहे.

 

यामालिकेतील दुसरा सामना गुरुवारी चंदीगडमधील मुल्लानपूर इथं तर तिसरा सामना धर्मशाळा इथं, चौथा सामना लखनऊमध्ये आणि शेवटचा सामना अहमदाबादमधीलनरेंद्र मोदी मैदानावर होईल.