गुवाहाटी इथं बारसापारा स्टेडियमवर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशीचा खेळ आज संपला तेव्हा भारताच्या २ बाद २७ धावा झाल्या होत्या. सलामीचे फलंदाज यशस्वी जैस्वाल आणि के एल राहुल बाद झाल्यानंतर मैदानात आलेले साई सुदर्शन २ धावांवर आणि कुलदीप यादव ४ धावांवर खेळत होते. याआधी दक्षिण आफ्रिकेने ५ बाद २६० धावांवर डाव घोषित केला होता. त्यामुळे आता सामना जिंकण्यासाठी भारतासमोर ५४९ धावांचं आव्हान आहे. पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेनं ४८९ धावा तर भारताने २०१ धावा केल्या होत्या. कोलकात्यात ईडन गार्डन इथे झालेला पहिला कसोटी सामना दक्षिण आफ्रिकेने जिंकला होता.
Site Admin | November 25, 2025 7:31 PM | Cricket
कसोटी क्रिकेट सामन्यात दक्षिण अफ्रिकेचा डाव ५ बाद २६० वर घोषित