क्रिकेटमधे वेस्ट इंडीजविरुद्धचा दुसरा कसोटी सामना भारताने ७ गडी राखून जिंकला असून ही मालिकाही २-० अशी जिंकली आहे. नवी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात आज खेळ सुरु झाला तेव्हा भारताला विजयासाठी ५८ धावांची आवश्यकता होती.
३ गड्यांच्या मोबदल्यात भारतीय संघाने १२१ धावा केल्या. वेस्ट इंडिज विरोधात कसोटी मालिकेतला भारताचा हा सलग १० वा विजय आहे. या सामन्यात कुलदीप यादव सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला, तर मालिकावीराचा मान रविंद्र जाडेजाला मिळाला.