November 16, 2024 8:40 PM | T-20 cricket

printer

टी-20 क्रिकेटमध्ये भारताचा दक्षिण आफ्रिकेवर १३५ धावानी विजय

टी-20 क्रिकेटमध्ये चार सामन्यांच्या मालिकेतल्या काल झालेल्या, चौथ्या आणि अंतिम सामन्यात, भारतानं दक्षिण आफ्रिकेचा १३५ धावांच्या मोठ्या फरकानं पराभव केला. या विजयासह भारतानं चार सामन्यांची टी-20 मालिका ३-१ अशी जिंकली आहे. २८४ धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा डाव १८ षटक २ चेंडूत १४८ धावांवर आटोपला. 

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना भारताने निर्धारित वीस षटकांत एका गड्याच्या मोबदल्यात २८३ धावा केल्या. तिलक वर्माने ४७ चेंडूत १२० धावा केल्या तर सलामीवीर संजू सॅमसन ने ५६ चेंडूत १०९ धावा केल्या.

दक्षिण आफ्रिकेकडून ट्रिस्टन स्टब्सने सर्वाधिक ४३ धावा केल्या तर भारताच्या अर्शदीप सिंगने ३ बळी घेतले. तिलक वर्माला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं.