डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

October 13, 2025 1:40 PM

printer

भारत आणि वेस्ट इंडीज सामन्यात फॉलो ऑन नंतर डाव सावरण्यात वेस्ट इंडिजला यश

नवी दिल्लीतील अरुण जेटली मैदानावर सुरु असलेल्या भारत आणि वेस्ट इंडीज क्रिकेट संघांदरम्यानच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज चौथ्या दिवसाचा खेळ सुरू आहे,  फॉलोऑननंतर वेस्ट इंडिजने पहिल्या डावातील पिछाडी भरून काढत दुसऱ्या डावात आघाडी घेतली आहे.

 

आज वेस्ट इंडिजनं कालच्या २ गडी बाद १७३ धावावरून आपला दुसरा डाव पुढे सुरू केला. शाई होप आणि जॉन कॅम्पबेल यांनी तिसऱ्या गड्यासाठी १७७ धावांची भागीदारी करत वेस्ट इंडिजला डावाच्या पराभवाच्या नामुष्कीतून बाहेर काढलं. शाई होप १०३ धावा करून बाद झाला तर कॅम्पबेलनं ११५ ची खेळी केली.