September 17, 2025 2:50 PM | Cricket

printer

महिला क्रिकेटमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सामना सुरू

महिला क्रिकेटमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना सुरू आहे. ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. पहिल्या सामन्यातल्या पराभवानंतर हरमनप्रीत कौर हिच्या नेतृत्वात भारतीय संघ दुसरा सामना जिंकून मालिकेत १-१ अशी बरोबरी साधण्यासाठी प्रयत्नशील आहे.

 

भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ आगामी आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेची तयारी करत असल्यानं ही मालिका दोन्ही संघांसाठी महत्त्वाची आहे.शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या २  षटकात    नाबाद   १३  धावा झाल्या होत्या.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.