आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील ग्रुप एच्या सामन्यात काल भारताने पाकिस्तान संघावर 7 गडी राखून विजय मिळवला. दुबईमध्ये झालेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघानं 19 षटकं आणि 3 चेंडूत 127 धावा केल्या.
ही लक्ष्य पार करताना अभिषेक शर्मा आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्या दमदार खेळीच्या जोरावर भारताने 25 चेंडू शिल्लक असतानाच हा विजय मिळवला. हा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित करत असून पेहलगाम हल्ल्यातील पीडितांच्या कुटुंबियांसोबत संघ उभा असल्याचं कर्णधार सुर्यकुमार यादव यानं सांगितलं.