आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा पहिला सामना आज दुबईत संयुक्त अरब अमिरातीशी होणार आहे.
स्पर्धेतल्या काल झालेल्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानने हाँगकाँगवर ९४ धावांनी विजय मिळवला. अफगाणिस्ताननं प्रथम फलंदाजी करताना ६ बळीच्या बदल्यात १८८ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना हाँगकाँगच्या संघाला ९४ धावांपर्यंतच मजल मारता आली.
येत्या २८ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणाऱ्या या स्पर्धेच्या अ गटात भारत, पाकिस्तान, ओमान आणि यूएईचा समावेश आहे. तर ब गटात श्रीलंका, अफगाणिस्तान, हाँगकाँग आणि बांगलादेश यांचा समावेश आहे.