डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

October 26, 2024 8:44 PM | Cricket

printer

न्यूझीलंडविरुद्ध तीन क्रिकेट कसोटी सामन्यांच्या मालिकेतल्या सलग दुसऱ्या सामन्यात भारताचा पराभव

न्यूझीलंडविरुद्ध तीन क्रिकेट कसोटी सामन्यांच्या मालिकेतल्या सलग दुसऱ्या सामन्यात आज भारताचा पराभव झाला. पहिल्या डावातल्या १०३ धावांच्या महत्वपूर्ण आघाडीसह न्यूझीलंडने विजयासाठी दिलेल्या एकूण ३५९ धावांच्या आव्हानाचा सामना करताना भारतीय संघाचा दुसरा डाव २४५ धावांत आटोपला. आजच्या पराभवासह  भारताने ही मालिकाही गमावली आहे. मालिकेतला शेवटचा सामना १ नोव्हेंबर रोजी होणार आहे. 

भारतीय संघाच्या दुसऱ्या डावात सलामीवीर यशस्वी जयस्वाल याने केलेल्या ७७ धावा आणि रविंद्र जडेजाच्या ४२ धावांचा अपवाद वगळता इतर फलंदाज फारशी चमक दाखवू शकले नाहीत. न्यूझीलंडच्या मिशेल सतनेर याने दुसऱ्या डावात भारताचे सहा गडी बाद केले. दोन्ही डावात मिळून १३ गडी टिपणारा सतनेर सामनावीर ठरला.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.