एजबॅस्टन इथं दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवसअखेर भारतानं इंग्लंडविरुद्ध पाच बाद 310 धावा केल्या. कर्णधार शुभमन गिल 114 धावांसह आणि रवींद्र जडेजा 41 धावांसह खेळत आहेत.
जसप्रीत बुमराहला विश्रांती देऊन वेगवान गोलंदाज आकाश दीप पदार्पण करत आहे. शार्दुल ठाकूर आणि साई सुदर्शन यांच्या जागी वॉशिंग्टन सुंदर आणि नितीश कुमार रेड्डी यांचाही समावेश केला आहे.