डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

नवीन पत हमी योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी

केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यात निर्यातदारांसाठी नवीन पत हमी योजनेला मंजूर देण्यात आली. या योजने अंतर्गत २० हजार कोटी रुपयांपर्यंतचं अतिरिक्त कर्ज दिलं जाईल, असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बैठकीनंतर वार्ताहरांना सांगितलं. याशिवाय सिझियम, ग्रेफाइट, रुबिडियम आणि झिरकोनियम या खनिजांसाठी रॉयल्टी दरांचं सुसूत्रीकरण करणं तसंच, २५ हजार ६० कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या निर्यात प्रोत्साहन अभियानाला मंजुरी देण्यात आली.  याबद्दल अश्विनी वैष्णव म्हणाले. 

 

दिल्लीमधल्या स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांना मंत्रिमंडळ बैठकीत श्रद्धांजली वाहण्यात आली. सरकार कोणत्याही प्रकारचा दहशतवाद सहन करणार नाही, असं वैष्णव यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.