उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आजपासून तामिळनाडूच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. चेन्नईतील डॉक्टर एमजीआर शैक्षणिक आणि संशोधन संस्था विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात ते विद्यार्थ्याना संबोधित करणार आहेत.
चेन्नईमधील रामनाथ गोएंका साहित्य सन्मान समारंभालाही ते उपस्थित राहतील. उद्या ते वेल्लोरमधील एका कार्यक्रमाला हजेरी लावणार असून चेन्नईमधील 9 व्या सिद्ध दिनाच्या समारंभालाही उपस्थित राहणार आहेत.