उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथं सम्राट पेरुंबिडुगू मुथरैयार दुसरे सुवरन मारन यांच्या सन्मानार्थ टपाल तिकिटाचं अनावरण झालं. तामिळ संस्कृती आणि भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून सातत्यानं दिल्या जाणाऱ्या पाठिंब्याचं त्यांनी कौतुक केलं.