देशातल्या सकारात्मक घडामोडींनी युवा पिढीमध्ये आशावाद निर्माण केला असून, यात माध्यमांनी महत्वाची भूमिका बजावल्याचं उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं ‘मनोरमा न्यूजमेकर पुरस्कार २०२४’ निमित्त आयोजित समारंभात बोलत होते. पत्रकारिता दुर्बल घटकांचा आवाज जगापर्यंत पोहोचवतो, असं ते यावेळी म्हणाले. अमली पदार्थांपासून मुक्त जबाबदार समाज घडवण्यासाठी जागरूकता निर्माण करण्यात माध्यमांचं मोठं योगदान असल्याचं ते म्हणाले. या कार्यक्रमात राधाकृष्णन यांनी केंद्रीय पर्यटन तसंच पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी यांना मनोरमा न्यूजमेकर पुरस्कार प्रदान केला.
Site Admin | November 16, 2025 7:43 PM | CP Radhakrishnan
पत्रकारिता दुर्बल घटकांचा आवाज जगापर्यंत पोहोचवते – उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन