डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

August 18, 2025 2:50 PM | CP Radhakrishnan

printer

रालोआकडून उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवार म्हणून घोषणा झाल्यानंतर राज्यपाल दिल्लीला रवाना

राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचं नाव घोषित करण्यात आलं आहे. 

 

राधाकृष्णन हे अनुभव समृद्ध असून, विविध पदांवर काम करताना त्यांनी समाजाची सेवा आणि उपेक्षितांना सक्षम बनवण्यावर भर दिल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमांवर लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही राधाकृष्णन यांच्या उमेदवारीचं स्वागत केलं आहे.

 

तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी राज्यपालांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचं अभिनंदन केलं आहे. उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर राज्यपाल राधाकृष्णन आज दिल्लीला रवाना झाले. पुढील महिन्याच्या ९ तारखेला उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार आहे.