महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून नामांकित करण्याच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) निर्णयाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वागत केले आहे. सोशल मीडिया पोस्टमध्ये मोदींनी सार्वजनिक जीवनात त्यांच्या दीर्घ काळात, श्री. राधाकृष्णन यांनी त्यांच्या समर्पण, नम्रता आणि बुद्धिमत्तेद्वारे स्वतःचे वेगळेपण दाखवले आहे. राधाकृष्णन यांनी विविध पदांवर काम करताना नेहमीच सामुदायिक सेवा आणि उपेक्षितांना सक्षम बनविण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. त्याचसोबत राधाकृष्णन यांनी तामिळनाडूमध्ये तळागाळात व्यापक काम केले आहे आणि खासदार आणि विविध राज्यांचे राज्यपाल म्हणून त्यांचा समृद्ध अनुभव आहे.
राधाकृष्णन यांच्या संसदीय हस्तक्षेपाचे कौतुक करताना प्रधानमंत्री म्हणाले की, त्यांच्या राज्यपालपदाच्या कार्यकाळात त्यांनी सामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यावर लक्ष केंद्रित केले. या अनुभवांमुळे त्यांना कायदेविषयक आणि घटनात्मक बाबींचे विस्तृत ज्ञान आहे. राधाकृष्णन एक प्रेरणादायी उपराष्ट्रपती असतील. दरम्यान, माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही श्री. राधाकृष्णन यांचे एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून नामांकन झाल्याबद्दल अभिनंदन केले.