प्रसारमाध्यमांनी लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून देशाच्या बांधणीत योगदान द्यावं असं आवाहन उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी केलं आहे. हैदराबाद इथं रामोजी एक्सलन्स अवॉर्ड २०२५ च्या उद्धाटन सोहळ्यात ते काल बोलत होते. आजच्या डिजिटल युगात चुकीची माहिती आणि बनावट बातम्यांचा प्रसार रोखण्याची गरज उपराष्ट्रपतींनी यावेळी व्यक्त केली.
या सोहळ्यात पल्लवी घोष यांना यशस्वी महिला म्हणून गौरवण्यात आलं. सतुपती प्रसन्ना श्री यांना कला आणि संस्कृती, आकाश तंडन यांना मानवतेसाठी सेवा, जयदीप हार्डीकर यांना पत्रकारिता, माधवी लता यांना विज्ञान आणि तंत्रज्ञान, श्रीकांत बोल्ला यांना युथ आयकन आणि अमला रुईया यांना ग्रामीण विकास या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल गौरवण्यात आलं.