हरियाणामध्ये भाजपाची तर जम्मूकाश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीची बहुमताकडे वाटचाल

जम्मू आणि काश्मिर तसंच हरियाणा विधानसभा निवडणूकीच्या मतमोजणीला आज सकाळी ८ वाजल्यापासून सुरुवात झाली. जम्मू काश्मीरमधे आतापर्यंत ४० जागांचे निकाल जाहीर झाले असून त्यात १९ ठिकाणी नॅशनल कॉन्फरन्सचे उमेदवार तर १४ जागांवर भाजपा उमेदवार विजयी झाले आहेत. तसंच काँग्रेस उमेदवार २ आणि  पीडीपी उमेदवार २ ठिकाणी विजयी झाले आहेत. माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला बडगाम मतदारसंघातून विजयी झाले असून गंदेरबाल मतदारसंघात आघाडीवर आहेत. आतापर्यंत मिळालेल्या कलांनुसार एकूण ९० मतदारसंघांपैकी २२ ठिकाणी नॅशनल कॉन्फरन्स, १५ ठिकाणी भाजपा, तर ४ ठिकाणी काँग्रेस उमेदवार आघाडीवर आहेत. पीडीपीचे उमेदवार २ ठिकाणी तर अन्य उमेदवार ४ ठिकाणी आघाडीवर आहेत. 

 

नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुक अब्दुल्ला यांनी मतदारांचे जाहीर आभार मानले आणि  ओमार अब्दुल्ला नवीन सरकारमधे मुख्यमंत्री होतील असं जाहीर केलं. हरियाणात ९० मतदारसंघांपैकी ४६ ठिकाणी भाजपा उमेदवार  तर २९ ठिकाणी काँग्रेस उमेदवार आघाडीवर आहेत. १३ जागांचे निकाल जाहीर झाले असून काँग्रेसचे ९ आणि भाजपचे ४ उमेदवार विजयी झाले आहेत.  यात ऑलिम्पिक पदक विजेती कुस्तीपटू विनेश फोगाट जुलाना मतदारसंघातून काँग्रेसकडून विजयी झाल्या आहेत. मुख्यमंत्री नायबसिंग सैनी लडवा मतदारसंघात आघाडीवर आहेत.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.